Ad will apear here
Next
कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाकडून सन्मान
कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा  सन्मान करताना महाविद्यालयाचे ट्रस्टी कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील व डॉ. जे. एस. भवाळकर, कर्नल डॉ. दीप शर्मा, डॉ. करुणा दत्ता आदी

पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थीरोग व क्रीडा चिकित्सा विभागाच्यावतीने क्रीडा चिकित्सा विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व ‘कॉमनवेल्थ गेम्स २०१७’मधील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे ट्रस्टी कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, आर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्नल डॉ. दीप शर्मा, प्राध्यापिका डॉ. करुणा दत्ता आदी उपस्थित होते.

कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांनी खडतर परिस्थितीवर मात करून कुस्तीला नवे स्थान निर्माण करून दिले आहे. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीचा आढावा डॉ. डी. एस. भामरे यांनी घेतला. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या अस्थीरोग विभागामध्ये क्रीडा चिकित्सा बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून, खेळाडूंनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन या वेळी डॉ. भामरे यांनी केले.

क्रीडा चिकीत्सा विषयक परिसंवादात खेळाडूचा आहार, व्यायाम, दिनचर्या, भौतिकोपचार, व्याधी, दुखापती, तपासण्या, योग्य उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना, परीक्षण, क्रीडा सराव आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विविध तज्ज्ञांनी या वेळी मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. डी. एस. भामरे, डॉ. बासू, डॉ. आलोक देवधर, डॉ. सुयश भंडारी, कर्नल. डॉ. दीप शर्मा, डॉ. उर्वशी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. कुलपती डॉ. पी. डी. पाटील व उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांचा मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZLKCC
Similar Posts
आयर्नमॅन स्पर्धेत डॉ. अभय लुने यशस्वी पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्ररोग शल्य चिकित्सक डॉ. अभय लुने यांनी नुकतीच झुरिच (स्वित्झर्लंड) येथे झालेली ‘आयर्नमॅन २०१९’ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या आठ भारतीयांमध्ये त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला.
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ पुणे : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेचा तीन विरुद्ध दोन गुणांनी पराभव करून अमनोरा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपले नाव कोरले. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लांनी असंख्य कुस्तीशौकिनांना थरारक अनुभव दिला. या लढतीत
‘महाराष्ट्र केसरी’स्पर्धेसाठी अभिजित कटके, साईनाथ रानवडे यांची निवड पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने ६२ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती व मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर करण्यात आला आहे. जालना येथे १९ ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी गादी विभागातून गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा पुणे : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे शहर क्रीडा विभागातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात झाल्या. या स्पर्धेमध्ये पुणे शहरातील ३० महाविद्यालयातील ८१ कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language